जिल्हा प्रशासनाकडून निबंध स्पर्धेचे आयोजन

जिल्हा प्रशासनाकडून निबंध स्पर्धेचे आयोजन 


परभणी, दि. 7 :- जिल्ह्याचा साहित्य आणि कला क्षेत्रातील वारसा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्‍याने नागरिकांसाठी 
जिल्ह्यातील साहित्य आणि कला क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्वे’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ऑनलाईन पध्दतीने रविवार दि.15 ऑक्टोबर 2019 पर्यंत प्रवेशिका सादर करावेत.

स्पर्धेसाठी प्रवेशिका फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असून त्याकरीता जिल्हा प्रशासनाने विज्ञान सुचना अधिकारी सुनिल पोटेकर यांच्या मदतीने एक स्वतंत्र पोर्टल विकसीत केले आहे. स्पर्धेसाठी प्रवेशिका फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येतील. युजर आयडी आणि पासवर्डची सुरक्षितता व गोप‍नीयता ही स्पर्धकाची जबाबदारी आहे. एका स्पर्धकास निबंध स्पर्धेसाठी जास्तीत जास्त दोन फाईल अंक दाखल करता येतील. स्पर्धा केवळ मराठी भाषेतच घेण्यात येणार असल्याने इतर भाषेत पाठविलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेसाठी 900 शब्दांची शब्दमर्यादा आहे. स्पर्धेसाठी दाखल केलेले साहित्य आणि छायाचित्रावर सेतू समिती आणि जिल्हाधिकारी यांचा संपुर्ण अधिकारी राहील. हे साहित्य आणि कलाकृती कोणत्याही माध्यमातून प्रसिध्द करण्यात स्पर्धकाचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही अशा नियम व अटी आहेत.
सहभागासाठी प्रथम स्पर्धकानेwww.collectorpbn.in संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी न्यु रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपले नाव आणि इतर माहिती नोंदवावी. निबंध स्पर्धेत प्रथम 2 हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय  1 हजार रुपये व प्रमाणपत्र आणि तृतीय येणाऱ्या व्यक्तीस 500 रुपये व प्रमाणपत्र परभणीचे जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते वितरण समारंभात प्रदान करण्यात येईल. असे निवासी उपजिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे

Post a Comment

0 Comments