प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज करावेत

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज करावेत परभणी, 

दि. 22 :- केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान मानधन योजना संपुर्ण देशात दि.9 ऑगस्ट 2019 पासुन सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्ष वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभुधारक व सिमांत शेतकरी नोंदणीसाठी पात्र आहेत. तरी आवश्यक कागदपत्रासह गावपातळीवरील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना भु-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. 


यामध्ये शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँकचे पासबुक, मोबाईल क्रमांक आदिची माहिती आपले सरकार सेवा केंद्रावर नोंदणी करण्यासाठी सोबत ठेवावेत. नोंदणीनंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम ॲटो डेबीटने विमा कंपनीकडे जमा होणार आहे. केंद्र व राज्य शासनाचे कार्यरत व निवृत्त अधिकारी- कर्मचारी, सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतील निवड झालेले शेतकरी, प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेतील शेतकरी, आयकर भरणारी व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक आदि प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अपात्र आहेत. काही अडचणीअसल्यास तहसिलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments